Thursday, June 30, 2016

निब्बर मनाची गब्बर यंत्रणा...!

साधारण दहा साडे दहाच्या आसपास आम्ही तिथे पोहचलो.
आम्ही पोहचन्यापूर्वी पंधरा वीस जन हॉल मधे बसलेले होते. त्यात चार पाच जनी होत्या आणि बाकीचे....!
गेल्या पंधरा वीस दिवसांपासून हे सारे जन एकाच गोष्टिवर काम करत होते आणि आज त्यांच्या कामाची पाहणी करुन पुढील रूपरेषा सावनेरकर साहेब  सांगणार होते.
प्रत्येक जन सावनेरकर साहेबांची वाट पाहत सोबत आणलेल्या फ़ाइल मधे बघून अति विशेष अशा प्रकारात सहज बसेल अशी चर्चा करत होते.

तशी हॉल मधे व्यवस्था छान होती...एयर कंडीशन मधे कोपऱ्यात कॉफी मेकर मशीन होती आणि प्रत्येकाच्या समोर मिनरल वाटरच्या बाटल्या पोज़ देत होत्या....!
समोरच्या प्रोजेक्टर स्क्रीन वर लिहिलेलं मी वाचत होतो तितक्यात सावनेरकर साहेब आणि त्यांचे सहकारी असे एकूण चार जन आत आले.

खुपच मोठा अर्थपूर्ण पॉज घेऊन साहेबांनी बोलायला सुरुवात केली,"आज आपण सर्व जन या ठिकाणी 'एकात्मिक कुपोषण निर्मुलन कार्यक्रम' अंतर्गत कुपोषणाची कारणे आणि उपाय या वर तुम्ही केलेल्या कामाची तपासणी करणार आहोत"

एक एक करून साहेबांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सगळ्या फाइली तपासल्या आणि काही दुरुस्तीचे शेरे सुद्धा दिले.
या सगळ्या प्रक्रियेत साहेबांचा तब्बल अर्धा तास वेस्ट गेला.
पुढच्या वेळी चूका व्हायला नको अशी सक्त ताकीद देऊन साहेब त्यांच्या पुढील 'नियोजित' कामासाठी निघुन गेले. आणि आजची बैठक संपली.

जाताना सर्वांनी नियोजित असलेले दुपारचे जेवण मनसोक्त उरकुन पुन्हा 'कुपोषणावर' जोमाने काम करण्यासाठी आपापल्या गावचे रस्ते धरले.

रात्रि उशिरा घरी पोहचल्यावर मी सहजच आजची बैठक रिकॉल करत होतो तेव्हा सावनेरकर साहेबांनी मला सुचवलेली दुरुस्ती आठवून डोळ्यातून पाणीच आलं......

सुचवलेली महत्वाची दुरुस्ती---

"तुम्ही जे हे कुपोषित बालकांचे फ़ोटो लावलेत फ़ाइल मधे ते जरा नीट आणि क्लियर क्वालिटीचे लावा जरा....बालक कसं कुपोषित म्हणजे कुपोषितच दिसायला हवं"

कुपोषणाचे खरे कारन म्हणजे हे सारे ढेरपोटे साहेब.....जे खाऊन खाऊन नुसते गब्बरच नाही तर लहान लेकरांच्या तोंडचा घास घेऊन पक्के निब्बर झाले आहेत.

निब्बर लोकांनी मऊ व्हावे म्हणूनच
आजची ही फिरकीBy
Vimalhari

मस्त फ़कीरा

मस्त फकिरा

आज भेटले फ़क़ीर
खुप छान हो हँसले
किती गोड सांगू हसु
बाळ सानुले भासले

निरागस भाव सारे
निरागस हावभाव
निरागस प्रेम त्याचं
घेई हृद्याचा ठाव

माला बोलले हसून
हो रे बाळा तू ही बाळ
निरागस लहान हो
घाल मोतियाची माळ

भाव निरागस मनी
शुद्ध प्रेम हे उपजे
निरागस बाळाचे ते
तेच विठुचे रूप जे

चला होऊ निरागस
प्रेम फकिराचे सांगे
हसु लहान लहान
देव हाच भाव मांगे

💜🌺💜
चला निरागस होउयात
लहान होउयात।
💜🌺💜

Tuesday, June 28, 2016

लपंडाव

दहा,विस्,तीस,चाळीस,पन्नास,साठ,सत्तर,ऐंशी,नव्वद,शंभर आलो रे भो.......लपून छपुन रहा रे भो...... परत राज्य देणार नै रे भो.......

लपणारे आपले मित्र जे की काही काळासाठी शत्रूच् म्हणुयात....
पण त्यांना सुद्धा लपन्यासाठी वेळ देणारा खेळ.....लपंडाव...!

धप्पा मात्र असतो अचानक...... धप्पा...!
आणि धप्पा झाला की खेळ पुन्हा सुरु......अगदी सुरुवाती पासून....!

जसा धप्पा तसेच अंडल-गंडल......ज्या भीडूच्या नावानं इस्टॉप् केलं त्याच्या ऐवजी दुसराच् तिथं असणं...!
आणि पुन्हा खेळ सुरु.....सुरुवाती पासून...!

आयुष्य असंच......धप्पा अचानक, मनी ध्यानी नसताना येतो..... सगळं संपल्यासारखं वाटतं पण हीच संधी असते किंवा अपरिहार्यता पुन्हा अगदी सुरुवातिपासून सुरु करण्याची....!
आणि
अंडल-गंडल सुद्धा असंच...... जगन्याच्या खेळातील एखादी गल्लत..... पुन्हा भाव मनांत सगळं संपल्यासारखे.....!

लपंडाव खेळताना राज्य तेव्हाच संपतो जेव्हा सारे भीड़ू इस्टॉप् होतात.

थांबू नकोस ........
राज्य अजुन संपला नाही ........
काम,क्रोध,मद,मत्सर,लोभ,मोह....सारे भीड़ू शोधायचे आहेत.... त्यांना इस्टॉप् करायचं आहे....
'ध्यान' ठेऊन शोध घ्यावा लागतो बाबा...... संसार म्हणजे धप्पा खूप वेळा.....!
एक वेळ धप्पा पुरेल मात्र गल्लत जास्त होते....अंडल-गंडल..!
आपण जे समजत असतो ते मुळात भलतच असतं.....!

लपंडाव खेळताना 'चित्त्' 'ध्यानावर' पाहिजे...!


चला लपंडाव खेळूयात
चित्त ध्यानावर ठेऊन..!
by
Vimalhari

Monday, June 27, 2016

comprehensive....म्हणजे सर्वसमावेशक...!

Comprehensive.......म्हणजे सर्वसमावेशक....!
विचार जिथे जन्म घेतात तो केंद्र असतो सर्वसमावेशक आणि त्यातून जन्माला आलेले विचार.....सहसा असतात संकुचित.....!
कारण विचार असतात सतत आत्मकेंद्रि... स्वतःचा विचार करणारे....संकुचित....!

खूप कमी विचार असतात comprehensive...!
छत्रपती शिवाजी महाराज एक खूप मोठ्ठा सर्वसमावेशक विचार आणि
छत्रपती शाहू महाराज एक दूसरा खूप मोठ्ठा सर्वसमावेशक विचार .......
आणि दोघांनाही सोबत एकाच घरात,एकाच वेळी,एकच विचार म्हणून आजही स्विकारु न शकलेली आमची संकुचित विचारांची पीढ़ी.

एक छत्रपती सर्वसमावेशक.....ज्याचं ब्रीद "सर्वांस पोटांसि धरने आहे".
एक छत्रपती सर्वसमावेशक......ज्याचं ब्रीद "माझं राज्य गेलं तरी बेहत्तर, मात्र मी अस्पृष्य-उद्धाराचे कार्य कधीच थांबवनार नाही'.

एका छत्रपती कड़े समावेशक म्हणून सावल्या तांडेल, तानाजी मालुसरे अन् जीवा महाला... आणि कित्येक... !
एका छत्रपतिकडे समावेशक म्हणून गंगाराम कांबळे,तुकाराम अण्णा...आणि कित्येक....!

दोन्ही छत्रपती सर्वसमावेशक comprehensive..!

आपण मात्र एक असेल तर दूसरे नको आणि दूसरे असतील तर पहिले नको...! आपण संकुचित समावेशक..!

आणखी एक खूप मोठ्ठा सर्वसमावेशक विचार.....!
सावित्री माई फुले...!
स्री शक्तीचा जागर अखिल सृष्टित सर्वव्यापी करणारा एक सर्वसमावेशक विचार आणि......
याच माईला स्री उद्धारासाठी पड़नाऱ्या प्रत्येक पावलावर शेनाची चिखलफेक आणि दगडांचा मारा करणारा एक संकुचित विचार...!

स्री ला सन्मान मिळवुन देणारी आई.....सावित्री आई.....! Comprehensive
आणि त्याच स्री ला आज ही बंदिनी हा समानार्थी शब्द लिहनारी एक संकुचित पीढ़ी...!

स्री ला असलेल्या मुक्त श्वासाची जाणीव करून देणारी आई...सावित्री आई....सर्वसमावेशक...!
आणि तिलाच "तिजोरितील हिरा" म्हणून तीची स्वतंत्रता हिरावनारी संकुचित विचारांची एक पीढ़ी...!

सावित्री माई तुझ्याच मुळे आज स्री शक्तीचा जागर झालाय, आभाळभर पसरलाय.....एक सर्वसमावेशक विचार बनून मात्र...
ती माणसं झी मराठी आहे सॉरी.... जी मराठी आहे ......
त्यांच्यात नाही माई उंच तुझा झोका.....!एक संकुचितपना...!

सावित्री माई तू सर्वसमावेशक तू घेतलं सामावून यांनी मारलेले दगडं आणि शेनाचे गोळे सुद्धा......सोबतच यांचे संकुचित विचारही......!

सावित्री आई होती सर्वसमावेशक म्हणूनच आज म्हणावं वाटतं की,
फ़क्त माई तुझ्यामुळे अन् तुझ्याचमुळे
"अजूनी उंच माझा झोका".

चला समजून घेऊयात दोन्ही छत्रपतींना  नेमकं....!
आणि सावित्री माई ला सुद्धा तिच्या सर्वसमावेशक विचारांसकट...!


चला comprehensive होऊयात....!
सर्वसमावेशक होऊयात...!
By
Vimalhari

हास्य रंग रंगला...!

आज रंग रंगला
ईथं गोप दंगला
काय सांगू गड्या
कसा जिव गुंगला

आज लै हसलो
नाही आज रुसलो
गड्या खरोखर आज
सारे ध्यानी बसलो

आज मजा लुटली
सारे बांधं फुटली
चिंतातुर झाडाचीही
गड्या फांदी टुटली

आज फुलं वाहिलि
हसुनिया पाहिली
गड्या पंढरिच ईथे
येउनीया राहिली

आज चिंब भिजलो
अहंकारी विझलो
गड्या हास्य मंदिरात
हसुनिया थिजलो

आता हसतच राहु
हसुनच जगा पाहु
आणि हसत हसत
ध्यान झऱ्यामधि वाहु....

😄☺😄☺😄

Thursday, June 23, 2016

फकिराचे दोन शब्द...!

||एक||

गुरु भक्ति ही रुजावी
समर्पण ही वाढावे
साधने च्या झऱ्यातूनि
मनी मळभ काढावे

गुरु माऊलीची कृपा
त्याले नाही मोजमाप
सद्गुरु वाचोनिया
कोण हरविल ताप

गुरु उपदेशामधी
एक तत्त्व हे रुजले
कोरडे हे विश्व तुझे
गुरुकृपेत भिजले

आज साधुनिया घ्यावे
आज भाग्य हे दाटले
गुरु कृपेचे हे क्षण
याची जन्मांत भेटले

आता नको दूर लोटु
आता जीव हा अर्पुनि
आता घे तू साधुनिया
जन्मों जन्मिचि पर्वणी


||दोन||

शत्रु कामरूपी
अर्थ बुद्धिनाशी
लक्ष् ठेव सारे
दुःखाच्या रे राशी

गनगोत सारे
मित्र शत धन
गुंतवु नको रे
यात् तुझे मन

वासना जन्मे जिथं
आहे संसार संसार
उठ याहुनि ऊपर
वैराग्यचे हेच सार

तुझी तहान तहान
हीच साखळी पायात
सोड तिची साथ गड्या
तवा येशिल लयात

तूच शुद्ध तूच सत्य
बाकि सारं झूठ आहे
किती सोप्प गूढ़ गड्या
जान हीच तूच पाहे

किती गड्या जन्म झाली
किती शरीर नासले
तरी सूटना ही आस
तरी सत्यच भासले?

नाही व्यर्थ घालविले
गड्या पुण्य कमविले
साक्षीभाव न जपला
संचितच जमविले

किती जन्मं फुका गेले
दुःख कर्मे त्वां केले
सोड कर्ता पण आता
साक्षी नेच मोक्ष आले


By
Vimalhari


Wednesday, June 22, 2016

नरसिंग्या....!

:"काय रे सुम्या, इथं काय बसलास एकटाच....!"
:"असंच...!"
:"आज परत काही बोललं का काय तूला ते नरसिंग्या....!"
:"हव....पण माझी कैच चूक नवति, मी तं उलट दीड तासांपासून उन्हातच हुभा होतो...!"
:"मंग, काय बोल्लं ते..."
:"त्यों मला म्हटला की तुला काय सावलीत बसायचे पैशे देतो काय."
:"सावलित ?"
:"हव्..त्यों आला तवा मी टेकलो वतो उल्शिक सावलीला....अन् तेवढ्यात त्यों आला."
:"सुम्या, तुला किती वेळा बोललो मी...नरसिंग्या लै कडु हाई ते.."
:"च्याला पम्या लै जीव वैतगला गड्या...काहीबाहि ईचार यतेत डोक्यात..."
:"अय, असं काय यड्यावाणी करतो सुम्या...तूच मला किती धीर देतोस गड्या अन् तूच असं बोलल्यावर काय कराव बबा मंग.......तूच बोलला हतास न की कही लोकं आजारी अस्तेत म्हणून...नरसिंग्या असाच आजारी है बघ...लै बेक्कार आजार असतो भो ह्यव्... त्याला बी कई कळत नै काय करतोय त्यों ते...! तेच कसं हे न सुम्या ह्या आजारात् लै मोठे मोठे गेलेत भो...! पण एक सांगतो बघ सुम्या कई होत नै बघ...!फड़फड़ करुन यतेत परत लाइनीवर...!अन् एक लक्षात ठेव भो काळ हेच मोठ्ठ् औषध हे बघ यांच्यावर."
:"बरोबर म्हणतो पम्या तू अन् च्यायला सगळं करुन सवरून बी नरसिंग्या असं वागतो म्हंटल्यावर कसं वागाव बॉ आता.."
:"हे बघ सुम्या कोण कसं वागतय हे कही आपल्या हातात नै, किती साऱ्या परकारचे लोकं...किती त्यांचे स्वभाव...कोना कोणाला डोकं लावायवचं गड्या...! दे सोडून..! अन् राहिली गोष्ठ नरसिंग्याची तर त्याला डोक्यात घ्याचं म्हटलं तर आपल्यालाच डोकं नसल्यासारखं हे बघ."
:"हव न यार, तुझ्या माझ्या मधी असाच एखान्दा नरसिंग्या असंल का रे...ज्याला कहिच दिसत नहीं...न मागचं न पुढचं...!फ़क्त स्वता पुरतं तेवढं दिसतं...अन् ज्याचा ईश्वास नै कोनावरच कधीच...जो खरं तर असतो घाबरलेला सवताच सवताला....ज्याला दुसर्याच्या हसन्याचाबी लै तरास होतो...ज्याला तुड़वायचं असतं सार्यांना पायखाली...अन् ज्यो रुतलेला असतो सवताच्या अविश्वासाच्या चिखलात....खोलवर...!"
:"सुम्या, एवढा ईचार करतो म्हटल्यावर तू सुम्याच् न भौ...
तुझ्यात कुठून यायचा बबा नरसिंग्या ते...!"

अन् असलाच तं जाळून टाक रे भौ तुझ्यातल्या नरसिंग्याला.....लौकरात लौकर....! 
खूप हसायचय अन् खूप जगायचय भो....!चला जगुयात
विमल-हरी

Tuesday, June 21, 2016

सैराट अन् IAS_IPS

सैराट....
संस्कार....
IAS.....अन्......IPS
आणि बरंच काही.........

सैराट मुळी प्रेम कहानी नाहीच.
तर लढाई आहे जगन्याच्या मुलभुत आधिकाराची.
मानवी मुल्याच्या मुळाशी जोडलेल्या प्रेमाची.
जिथे मानवीय सम्बन्ध हे फ़क्त तीव्र प्रेम भावनेने जोड़ेलेले आहेत.
माणसाने माणसाला फ़क्त मानुस म्हणून पाहावे ह्यसाठी केलेला खटाटोप.
त्यासाठी विषय असा निवडला की जो सहज पोहचेल साऱ्यापर्यंत अगदी सहज....
कारन प्रेम मुलभुत आहे.

यश, कीर्ति, प्रतिष्ठा या त्या नंतर.....

म्हणून परश्या अभ्यास करुण IAS होण्यापेक्षा आर्ची च्या प्रेमाखातर जगण्याशि झुंजतो ते कुठे तरी पोहचते.

आज प्रेरणा म्हणून IAS अधिकारी आणि त्याच्या संघर्षाची कहानी जीवनाचे नवे आयाम समोर आनीलहि....

मात्र मला तरी वाटते जन्माला आलेला प्रत्येक जन IAS IPS होने आनंदाचे मात्र कठिनच....

पण जन्माला आलेला प्रत्येक जीव जोडलेला असतो सतत त्याच्या जगन्याच्या मुलभुत आधिकाराशि आणि प्रेम ह्या मुलभुत प्रेरने सोबत.सैराट 100 कोटी पल्याड बघायला शिकवत असतो.
सैराट यशस्वी जगणं शिकवित नसेल कदाचित
मात्र जगन्याचं यश कशात आहे हे नक्की शिकवित असतो.
शेवटी काय
ज्याचा त्याचा चश्मा.....सैराटचा चश्मा..!

🌷🌺🌷


विमल-हरी


Monday, June 20, 2016

लेमनगोळी...!

आमच्या शाळेतल्या लिम्बाच्या झाड़ाख़ाली एक आज्जी रोज बसायची...तिचं छोटसं दुकान थाटून...!
मी चारण्याच्या लेमनगोळ्या घ्यायचो अन् दिवस भर चघळीत बसायचो.....मज्जा यायची..!
एक दिवस आज्जीच्या दुकानात एक नविनच शक्कल आली...चारण्याच्या चॉकलेट मधी एका चिट्ठित नंबर निघनार आणि त्या नंबर वरुन तुम्हाला बक्षीस....!
मी पण घेतलं आणि मला बक्षीस म्हणून लियांडर पेस चं स्टीकर भेटलं...ते मी कंपासात आतून चीटकवलं आणि घरी गेलो..!
आई ला सांगितलं आणि ते स्टीकर सुद्धा दाखवलं ......!

नंतर काय तर फटकेच फटके..!

रडलो ....... रडू थाम्बलं..!


आईने तेव्हा सांगितलं ते आज ही पक्क़ लक्षात आहे...

चारण्याच्या लेमनगोळ्या चघळण्याची मज्जा तेव्हाच संपली जेव्हा त्या चारण्यात गोळी सोबत स्टीकर आलं... उद्या कदाचित काहीच भेटनार नाही त्याच्यासोबत पण तेव्हा मात्र त्याच्यासोबत मिळालेल्या गोळीची मज्जा हरवून बसेल..कारण आता बक्षीस नाही...हाव मोठी वाईट गोष्ठ...अन् हीच जुगाराची खरी पहिली पायरी..!
आणि हे असंच होतं...!
दुसऱ्या दिवशी पासून ते आज पर्यन्त लेमनगोळीतच मन अटकवून ठेवलय....कुणी म्हणेलही कदाचित अल्पसंतुष्ठ...तर म्हणू दे......


लेमनगोळी ची गोड शिकवण मी आज ही लक्षात ठेऊन आहे.
विमल-हरी

Sunday, June 19, 2016

माझ्या शाळेची पायवाट...!


माझ्या शाळेची पायवाट मी रोजच तुड़वीते अगदी नाचत नाचत...
कारण
ती पायवाट सुरु झाली की माझ्या कुहू ला मिळतो प्रतिसाद कुठल्यातरी झाडातुन सहज....
फुलपाखरु किती नाजुक आणि सुन्दर ...सहज येवून बसतं माझ्या तळ हातावर...
दवबिंदुच्या मोत्याच्या कणांना हात लावत नाही मी कधी कारण मला माहीत आहे की त्याचा झगमगाट सारा खोटाच्...!
निसर्गाचं हे चित्र दाखवत दाखवत माझ्या शाळेची पायवाट मला रोज शाळेत घेऊन जाते....

शाळेत 'कोयल' आहे माझ्या....नाजुक अन् सुन्दर....तिच्याकडे असते खूप महागड्या कम्पास पेट्या,पेन,पेन्सिल आणि सारं....

ती माझ्याशी बोलतही नाही...
सर, तिला माझ्या शेजारी बसू ही देत नाही
आणि हो ती मला तिच्या कम्पास पेटीला हात पण लावू देत नाही....

मला परत आठवते तेव्हा सकाळची माझ्या शाळेची पायवाट..कुहू जी बोलते, नाजुक फुलपाखरु जे येऊन बसतं हातावर, आणि हातात घेतल्यावर संपणारे दवबिंदु...!

मला जसं ते चित्र आवडतं निसर्गाचं....
तसं शाळेच्या भिंतीवरचे काही चित्र खूप आवडतात...
त्या चित्रांच्या ख़ाली लिहिलेलं असतं
पहिल्या चित्राखाली... छ.शाहू महाराज
दुसऱ्या चित्राखाली....डॉ.बाबासाहेब आंबेडकर
तिसऱ्या चित्राखाली...म.फुले

Saturday, June 18, 2016

धर्म...दंगल..अन् माणूस..!

धर्म म्हणजे देवाला जाणून घेण्याचा मार्ग...
देव जो सर्वव्यापी..
जो जळी,स्थळी,काष्टि, पाषाणी,आत बाहेर सर्व.....

पाण्यात बुडालेल्या हंड्या सारखे आपण...पाणी हंड्यात आहे की हंडा पाण्यात हे कसं ओळखनार....अगदी तसं....

हेच कोडं सोडण्याचा प्रयत्न चालू झाला आणि चालू आहे आणि चालू राहील निरंतर....
पूर्वी जग जोडलेलं नव्हतं आणि प्रत्येक समुदाय हे कोडं सोडवीत होता की .....  कोण आहे विश्वाचा नियंता.....?
हाच शोध घेता घेता त्या त्या ठिकाणचे आहार, रहन-सहन, कृषी, अर्थ व्यवहार त्यात रिफ्लेक्ट होत गेले... भिन्न भिन्न धर्म उदयास आले आणि कुठे तरी आस्तित्वाचा शोध वर्चस्वाचा होऊ लागला....!

राम रहीम कुणाला पाहिजे...?

दुर्दैव
माणुसकी संपली...
आणि दंगली होऊ लागल्या...
आंधळे, विकारी, बीनडोक लोकांची गर्दी जमु लागली आणि गर्दीचा फायदा घेणारे सुद्धा....

आणि दंगल हा व्यवसाय झाला....काही लोकांचा...

चुकी गर्दीची आहे
चुकी गर्दीतल्या आपल्या चेहर्याची आहे...

विष कालवू नका...
विषारी साँप ओळखा...
सर्व धर्मांचा आदर करा....
सर्व धर्मांचा अभ्यास करा....

जिथे सूर्य तापलेला असतो ते अर्थातच चंद्राची पूजा करणार
आणि जिथं मुबलक पिकतं ते अर्थातच शाकाहारी असणार....!

धर्माची जोड़ ईश्वरी सत्तेशी लावा.....
हात जोडून विनंती ......

आपण जर वयस्क असाल तर थोड्यासाठी विष कालवू नका...आणि झालेली चूक सुधारा....
आपण जर तरुण असाल तर हा विचार पोहोचु द्या किमान तुमच्या स्वतःच्या हृदयात...
आणि लहान लेकरांनो तुम्ही मानुस म्हणून मोठे व्हा....
आम्ही तुम्हाला मानुस बनविन्याची शपथ घेतो.

आजच्या मोठ्या बातमीतूण खूप मोठा धड़ा घेऊन...
चला चूका सुधुरुयात...
एकत्र येऊन प्रेमाने उद्याचा मानुस बनवूयात....
मानव धर्म स्विकारुयात...

विमल-हरी...!Friday, June 17, 2016

मनमौजी फ़कीरा..!

आज काल मनमौजी मस्तमौला फ़क़ीर भेटन्यासाठी आतुरच असतो पण मीच त्याच्याकडे खूप दुर्लक्ष करीत असतो..... ऑफिसच्या गड़बडीचं कारन तर कधी आम्लपित्त... कधी मित्राशी महत्वाच्या कदाचित नसलेल्या गोष्टिसोबत गप्पा.... आणि बरंच आणि सहसा निरर्थकच्....

सहज भाव असावा म्हणून करावं असं काही....
तर पुन्हा प्रश्न पडतो करत असलो आवर्जून तर भाव सहज कसा म्हणावा...?

असो....

आज पुन्हा भेटले हो
मला कालचे फ़क़ीर
म्हणे कारे तू उदास
कारे करितो फिकिर

जरा बोल गड्या ईथे
नको मनामधी ठेऊ
व्यक्त होणं मोठं सूत्र
समजून जरा घेऊ

हसु आणि विसरणे
जसे आहे मोठे सार
तसे बोलने सरळ
नको बसु गप्पगार

जसं मनामधी आहे
तसं जनामधी ठेव
नको उगी लपाछपी
तवा दिसतो रे देव

देव तुझ्या मनामधी
तूच झाकून ठेविला
काढ़ एक एक थर
बघ देवच राहिला


एका हृदयशस्त्रक्रिया दालना बाहेर लिहिले होते की.....
वेळीच योग्य ठिकाणी ओपन केले असते तर आज कात्रीने उघडायची वेळ आली नसती।


चला सारे व्यक्त होउयात....
हसूयात....
विसरुयात.....
आणि व्यक्त होउयात....

Thursday, June 16, 2016

हसनं हीच साईकल...!

एक मानुस दररोज एका चेक पोस्ट समोरून साइकिल वरुण गोनी घेऊन जात असे आणि चेक पोस्ट वरील इंस्पेक्टर दररोज त्याची गोनी न चुकता चेक करत असे.... आणि त्यात दर रोजच वाळू सापडत असे.

असा नित्यक्रम जवळ जवळ वर्षभर चालला असेल.
नंतर त्या इंस्पेक्टरची बदली झाली आणि त्या मानसाचे ही सायकल वरुन वाळूची गोनी घेऊन जाने बंद झाले.
काही दिवसांनी त्या शहरात चोरी केलेल्या जवळ जवळ 250 ते 300 सायकली सापडतात.


चला आता खरी गम्मत....करुया.....

आपलहि असं च काहीसं होतं...
सुख हे त्या सायकली प्रमाणे ....
आणि इंस्पेक्टर म्हणजे आपण स्वतः

गोनी आणि वाळू म्हणजे बिन महत्वाच्या गोष्टि....
आयुष्य निघुन जातं आणि आपण मात्र वाळू आणि गोनी यातच अडकून बसतो.
सुख सायकल सारखं लख्ख डोळ्यासमोर...... आपण मात्र लक्षही देत नाही....
आणि शेवटी मात्र हाच विचार असतो की साइकिल लख्ख समोर होती आणि आपण......

हँसा
साइकिल कड़े लक्ष्य ठेवा...
गोनी मधे अड़कु नका...चला हसूया हसूया
चला हसूया हसूया

अनमोल आहे असे
चला आज हो अर्पूया


देव राजा त्या मनीचा
ज्यात हसु वसतसे
देव त्याच्या साठी उभा
जो सदा हसतसे

आज मोकळे मोकळे
चला करुया आकाश
कसा हसून हो बघू
देव येतो सावकाश


हास्य हलके हलके
हास्य पुष्प मकरंद
देव अन्तरिचा दाटे
मनो मनी हो सुगंध

हास्य दरवळ अशी
कशी निखळ निखळ
देव नाचे अंतरात
जसा झरा अवखळ

उगी विचार फिचार
उगी गोंधळ मांडला
देव नाचताना बघ
घट चिंतेचा सांडला

आज पासून आपन साऱ्यांनी फ़क्त हसायचं.
किती छान...
मी अडकलोय,.,बाहेर कसा येईल...येशिल रे बाबा ..... पण आधी हसून घे पुरेपूर....

माला नेहमी असं वाटतं आणि माझं मन खातं.....
बघ आधी हसून घे.
मनाला खाऊ नको जे वाटतं ते चांगलं करुन टाक....आणि हो परत मनसोक्त हसावे...

हँसने हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी हसनारच....
विनाकारण हसनार...

मी आत्ता पासून सतत गाणी गुनगुननार.....
माझ्या चेहऱ्यावर सतत स्माइल असणार....
मी डिंग्चक ऑफ बिट नाचनार सुद्धा....
मी लहान लेकरांना बघत जाईल....आणि लहान होईल.....मी हसनारच।
मी हसनारच।
आणि मी हसनारच|


महेश नवले

Tuesday, June 14, 2016

मस्तमौला फ़क़ीर...!

मस्तमौला फ़क़ीर, मनमौजी अवलिया भेटला काल....
नजर भीड़लि आणि फ़क़ीर बोलू लागला.....
आकाशात गूढ़ नजर स्थीर करत,

"मन कोषामधी असं
फूल पाखरू पाखरू
मोठं होऊ पाहे जीव
गोड मधाळ साखरू......

मना धडपड अशी
कशातच हो रमंना
निघु पाहे कोषातुन
तरी त्याला ते जमंना.....

चालू दे रे धडपड
जशी सहज स्वीकार
नाही तर कोष तुझा
अन् त्याची तू शिकार.....

मना वाट पाहे रोज
बळ नीतनेम वाढे
हळू हळू तेच बळ
त्याले कोषातुन काढ़े.....

नको घाई धरसोड
अगा नीतनेम बरा
कोष आपोआप तूटे
बघ पडल्यात चीरा.......

बघ भासू लागलेत
जीवा उडण्याचे बळ
अगा तुझ्या पखामधी
दम धर थोड़ा येळ......

कोष कशासाठी आहे
त्याले कळते कळते
तूझी धडपड मेली
तूझी तुलाच छळते.....

तूझी धडपड मेली
तूझी तुलाच छळते......."


आकाशात स्थिरावलेली ती गूढ़ नजर अस्तित्वाशी एकरूप झालेली.....
रुजवित होती अस्तित्वाशी असलेलं खरं खुरं नातं....
ईश्वरी शक्तीचा खराखुरा स्पर्ष......
जो भेटतो फ़क्त आणि फ़क्त सहजतेतून....
मुक्त स्वातंत्र्यातुन....
बंधनमुक्त प्राणातून.....
उघडलेल्या मनांतून......
स्वीकृतिच्या भावातुन......
आणि अपेक्षाशून्य ओढितून.....


फ़क़ीर---"सारी मुखवटे लीलया काढून ठेवलेला मानुस...!"

माणूस--"सारी विकारी व्रुत्ती लीलया सांभाळून ठेवलेला भिकारी....!"

फरक इत्तुसा...!फ़क़ीर समजून घेताना....
महेश नवले

Monday, June 13, 2016

चंद्राची भाकर..!

मी: "अमुक कवीला म्हणे पोर्णिमेच्या चंद्रामधे भाकर दिसायची".

ती:"का?"

मी:"बहुतेक....तो उपाशी असेल दोन चार दिवसांपासून...!"

ती:"का?"

मी:"गरीब असेल....दोन वेळच्या जेवनाची भ्रांत.."

ती:" कविता बऱ्या सूचतात ....उपाशिपोटि...!"

मी:" कविता नाही गं ती, ते तर विचारांचं काहूर..! उर फूटेस्तोवर विचारला गेलेला एक प्रश्न या बधिर व्यवस्थेला...!

ती:"त्यात व्यवस्थेचा काय दोष? त्याला कुणी थांबवलय काम करायला, पैसे कमवायला...?"

मी:"थांबवलं नसेल असं तरी कसं म्हणावं,
थांबवलं असेल एखाद्या प्रस्थापितानं कदाचित त्याची जात पाहून,

थांबवलं असेल इथल्या न्यायव्यवस्थेनं कदाचित त्याच्याकड़े पैसा नव्हता म्हणून,

थांबवलं असेल एखाद्या नीतिवान प्रतिष्टीतानं कदाचित तो खरं बोलतो म्हणून,

थांबवलं असेल एखाद्या श्रद्धावान समूहानं कदाचित त्याला ...नेमका खरा देव कुठे असतो ते दाखवलं म्हणून,

थांबवलं असेल त्याला मुखवटा धारण केलेल्या शेळ्पट लोकांनी कदाचित तो खरा चेहरा घेऊन मिरवतो म्हणून,

थांबवलं असेल त्याला निर्बुद्ध धर्मरक्षकांनी कदाचित तो उध्वस्त करतो त्यांची अढळ व्यवहारी धर्मसत्ता म्हणून,

थांबवलं असेल त्याला तथाकथित पुरोगामी विचारधारेनं कदाचित तो सिद्धार्थ गौतम समजून सांगतो म्हणून,

थांबवलं असेल त्याला तो खुपच पुढे गेला होता त्यांच्यापासून म्हणून........."

ती:"मी कधी असा विचार केलाच नाही."

मी:" असू दे तो बघ,
पोर्णिमेचा चंद्र ....
एक पूर्ण भाकर...."

ती:" पण तू तर उपाशी नाही नं, तरीही भाकर.....!"

मी:" मुखवटा चढ़वलेल्या या बेगड़ी जगात भूक ही फ़क्त भाकरिची नाही गं... कधी कधी ती अशा माणसाला भेटुनही शमते ज्याला चंद्रात भाकर दिसते ........."

चंद्रातील भाकर बघताना
महेश नवलेफिरकितले प्रश्न...!

आज फिरकी विथ महेश नवले या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत.
आज आजु आणि बाजू ला जेव्हा जेव्हा आपण तिरक्या नजरेने पाहतो तेव्हा तेव्हा आपल्याला काही न विचारले जाणारे प्रश्न स्पष्ठ दिसतात. तर, आज आपण अशाच प्रश्नांना वाचा फोड़नार आहोत.
तर प्रश्न आहे की
1) काही लोकं राजीनामा का देतात ?
-कारण त्यांना मुक्ताईच्या यात्रेला पाठवलेले असते.
2) काहीच लोकं तुरुंगात का जातात ?
-कारण त्यांच्या घड्याळिमधे वेळ चुकीचा आलेला असतो.
3) एखादा मानुस प्रधानमंत्री झाला नाही म्हणजे होऊ शकला नाही तर तो राष्ट्रपती होऊ शकतो का आणि कधी ?
-तो राष्ट्रपती होऊ शकतो फ़क्त त्याची प्रधानमंत्री होण्याची इच्छा मेलेली असावी लागते.
4) खाते या शब्दाचा शोध कुणी लावला ?
-सुरुवातीला शब्द दुसराच् होता मात्र खान्याचे प्रमाण वाढल्या मुळे खाते शब्द प्रचलित झाला असावा नेमका शोध कुणी लावला ते ठळक सांगता येणार नाही.
5) सध्या नाशिक परिसरात जसे सार्वजनिक बांधकाम जोरात चालू आहे तसेच सिंचन आणि जलसंपदेची कामं कोकणात आणि महाराष्ट्रातील इतर पावर फूल ठिकाणी कधी होणार ?
-आता ती कामे होतील असं वाटत नाही कारन की तिन्ही ठिकाणांपैकी एकाच ठिकानाची निवड घड्याळामधे योग्य वेळ बघून झाली होती.
5) मुक्ताबाई यांच्या यात्रेत जो गोंधळ झाला तसाच गोंधळ चिक्की प्रसादाहुन यापूर्वी झाला होता ? यात काही साधर्म्य आहे का ?
-साधर्म्य असन्याचे जरा स्पष्ठ दिसत आहेत कारन की चिक्की प्रसाद आणि मुक्ताई यात्रा हे दोनही प्रसंग नागपुर मुख्यालया पासून जरा दुरच घडले आहेत.
6) आर्मस्ट्रांग जसा चंद्रावर गेला तशे बाकीचे कधी जातील? की आर्मस्ट्रांग चंद्रावर गेल्यामुळे आता मोहीम संपली म्हणायची का ?
-मोहीम संपवायाची की नाही हे फ़क्त काळच ठरवू शकतो म्हणजे पुन्हा वेळ आली आणि वेळ आली म्हणजे घड्याळही आलीच.
7) वाघ सिंह हे प्राणी खरे आहेत का? आणि जंगलाचा राजा नेमका कोण असतो?
-राजा कोण आहे कुणास ठाऊक मात्र राजधानी नागपुर आहे असे वाटते.
8)सिंह आणि वाघ जंगलात राहुनही बरोबर वेळ कशी साधतात जंगलात कुठे घड्याळ आहे का? असेल तर ती नेमक्या कुणाच्या हातात आहे सिंहाच्या की वाघाच्या की दोघांच्या?
-सिंह अधुन मधून घड्याळात बघत असतो मात्र वाघ जास्तच वेळ साधत आहे.
9)रेल्वे इंजिनचा शोध कुणी लावला आणि ते का चालत नाही ?
-रेल्वे इंजिनचा शोध अतिमहत्वकांक्षेपायी लागला आणि त्यामुळेच ते चालत नाही.अश्या अनंत प्रश्नांसह तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटुयात याच वेळी याच ठिकाणी तो पर्यन्त वाचत  रहा
फिरकी विथ
महेश नवले

Sunday, June 12, 2016

जंगलराज पेक्षा भयानक....!

जंगलात फिरताना एक वाघ भेटला....!
दचकलोच....!
हसला अन् बोलला ,"अहो मानुस...ओ मानुस .... या जरा बसा........गप्पा मारुयात.....खूप दिवसांचं साठवून ठेवलय.....जरा मोकळं करुयात...बसा...
अन् तुम्ही असं काय दचकतायत राव, माझीच फाटते तुम्हाला बघून..........
रक्ताची चटक माझ्या पेक्षा तुम्हालाच जास्त..!"
ऐकून हादरलोच...!
तो आणखी बोलू लागला.." हादरल्या सारखं काय करताय, खरं तेच बोलतोय मी.., अहो माणूसराव, तुम्ही आम्हाला जंगल राज, जंगल का कानून म्हणून हिनवत असता, पण मला सांगा आम्ही तरी निसर्गाच्या न्यायाने चालतो हो...आमची सारी उठाठेव अस्तित्वासाठी, तुमच्यासारखं नाही हो...!"
"आमच्या सारखं नाही म्हणजे ... आम्ही काय करतो असं..?"---मी
"अहो चिड़ताय काय असं .... मानुस आहात तुम्ही...चिड़ताय काय..? आणि हो मी सांगत होतो आमची लढाई अस्तित्वासाठी तुमच्या सारखं नाही वर्चस्वासाठी...
तुमचं सारं वर्चस्वासाठी ......!
मी मोठा की तू मोठा..!
शिकार करणारा मी आणि शिकार झालेला हरिण दोघेही आपापला धर्म सांभाळतो...दोघे ही जीवाच्या आकांतानं जिवासाठीच धावतो...!
तुमच्या सारखं नाही जीव घेण्यासाठी ....!
जंगलातही म्हाताऱ्या वाघाची दहशत असते बर्ं.... वृद्धाश्रम नसतात इकडे आणि म्हणून माकडंही शेपुट ओढ़त नाही आमची..!
अहो इकडे आमच्या जंगलात मानुस म्हणजे शिवी आहे शिवी...!
निसर्गानं सर्वात सूंदर बनवलं होतं तुम्हा माणसांना .......किती कीळसवाने आहात तुम्ही....!
घाणेरडा हव्यास आणि फुकटच्या स्वार्थापायी काय दलिन्दर अवस्था करुन घेतलीय तुम्ही..
आम्हाला जंगल राज म्हणून हिनवता आणि स्वतः किती किती नर्ड्यांचा घोट घेत असता हिन जाती अभिमानापायी.....
जंगलात दंगली घडत नाही हो......तुमच्यात होतात ....... कानून आहे आमचा आणि आम्ही पाळतो......तुम्ही मात्र सत्ता आणि सम्पत्तिच्या जोरावर आणखी किती लक्तरे लोळवणार आहात तुमच्या न्यायव्यवस्थेचे....! आणखी किती रक्त शोषणार आहात तुम्ही चारीत्र्याचे, एकतेचे अन् नितिमत्तेचे ........
तुमचं हे तुम्ही उभं केलेलं चित्र दुरुन जरी अन्त्ययात्रा वाटत असली तरी ही तुमची विकारांची नग्न वरात आहे आणि त्यात तुम्ही सारे सरसकट सामिल आहात.....मानुस असल्याचा माज चढलाय तुम्हाला माज.....!"

मी शरमेनं मान खाली घातली अन् काही तरी बोलावे म्हणून बोललो की,
"असू द्या शेवटी मानुस ही जनावरच आहे एक."

वाक्य पूर्ण होताच आवेशानं तो गरजला,
"खबरदार, जर स्वतःला जनावर म्हणून घेशील तर,आम्ही तो आमचा अपमान समजतो.......आणि मान अपमानासाठी गळे चिरण्याची आमची रीत नाही..म्हणून वाचलास....चल निघ आता.... !"मानुस म्हणून घेताना
महेश नवले

Saturday, June 11, 2016

दाभोळकरांचा देव समजून घेताना....!

आदरणीय दाभोळकर साहेब,
आज तुम्हाला मुद्दामच पत्र लिहित आहे.
निमित्त आहे आज तुमच्याशी बोलण्याचे.
तुम्ही देवाला कधीच विरोध करत नाही उलट त्याच्या जवळ जाण्याचा, त्याला अनुभवण्याचा सहज मार्गच् तुम्ही आम्हाला सांगत असता नेहमीच, गाडगेबाबा सुद्धा असेच तुमच्यासारखे...! साहेब मुळात आम्हाला देव नकोच आहे, नाहीतर तो दिसलाच असता नं आम्हाला अन्तरात डोकवताना, निरागसपने हसतांना, मदतीचा हात देताना, हिरवाईला पाहताना, बरसणाऱ्या सरींना झेलताना आणि अनंत हातांनी कृपा बरसविनारा तो आहेच आत-बाहेर सारीकडे....... तुम्ही त्याच्याशी संवाद साधन्याची कलाच शिकवत आहात आम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन नावानं...!
अंधार असा कधी नसतोच नं साहेब , उजेड नसल्यामुळे त्याचं अस्तित्व..... देवासाठी आमचे समज ही तसेच अंधारासारखे , उजेड म्हणून तुमचा विचार लख्ख प्रकाश म्हणून येतो आणि आमच्या श्रद्धे मधला अंधार लीलया काढून टाकतो.
सश्रद्ध आणि अंधश्रद्ध यातील फरकच तर तुम्ही सांगता नं साहेब...!
साहेब, श्रद्धाळु लोकं तर भक्ति जाणतात, शुद्ध प्रेम मयी भक्ति आणि ती रुजू लागली की माणसामधील देव हळू हळू खुलु लागतो.
पण साहेब , आम्हाला देव नको अन् भक्ति नको आम्हाला तर पाहिजे व्यवहार फ़क्त व्यवहार जिथं भक्त नको तर गिरहाइक् पाहिजे आणि श्रद्धाळु नको तर पेशंट पाहिजे.आणि म्हणूनच आम्ही सुरु केली आहेत दवाखाने आणि दुकाने ठिकठिकाणी...!
साहेब,
तुम्ही जेव्हा आमची अधिष्ठानं उध्वस्त होतील असे क्रांतिकारक विचार रुजवू लागले तेव्हा धर्मरक्षक या नात्याने काहीतरी करण्याची वेळ आल्यासारखे आम्हाला वाटले मात्र आमची योजना वेळीच ओळखून तुमच्यावर होणाऱ्या संभाव्य हल्ल्याचा आरोपी अटक झाल्याची आज बातमी वाचली आणि हेच निमित्त साधुन आज हे लिहित आहे.

साहेब, तुम्ही मजेत आहात नं, कारण काही लोकं म्हणतात की अडीच पावणे तीन वर्षं झाले तुम्ही शांत आहात.....
साहेब, असं कधी वाटलं नाही म्हणून....
तुमचा एक एक विचार रोज क्रांति घडवतोय म्हणून...
तुमच्या विचारांना संपवु पाहणाऱ्यांचे धाबे दनानले म्हणून....
देव आता स्पष्ठ दिसायला लागला म्हणून....
देव आणि धर्म यातील फरक दिसायला लागला म्हणून....
रोज नवे नवे उदाहरणं स्थापित होत आहेत म्हणून....
आणि म्हणून विचारलं ,
साहेब , तुम्ही मजेत आहात नं....!देव समजून घेताना
महेश नवले

Friday, June 10, 2016

शिवाजी राजं समजून घेताना....!

शिवाजी समजून घेण्यासाठी
म्हणे शिवाजी व्हावं लागतं
इथं आम्ही मुर्दाड सारे
तुम्हाला सांगायला काय जातं..!
ईमान आम्ही विकलाय इथं
विकल्यात आम्ही लाजा
तुम्ही आम्हाला काय सांगता
समजून शिवाजी राजा

आमच्या मनांत मुसलमानांना
कापनारा तो शिवाजी
आमच्या मनांत हिरवं निशान
 जाळनारा तो शिवाजी
खरं सांगायचं तं शिवाजीसाठी
नमाज़ पढायचा काजी
असा सारा सावळा गोंधळ
कसा समजनार राजा शिवाजी

स्वराज्यासाठी प्राणपणानं
मावळा आमचा लढला
आज मात्र ज्यानं त्यानं
जातीनं निवडून काढला
मी अमक्या जातीचा म्हणत
लढला असेल का तानाजी
हो असेल उत्तर तर
कसा समजनार राजा शिवाजी

ज्यानं त्यानं सोयीसोयीनं
इतिहास असा रचला
याचा वाढला स्वाभिमान
त्याचा मात्र खचला
या इतिहासाला महाराज सुद्धा
झाले असतेत का राजी
हो असेल उत्तर तर
कसा समजनार राजा शिवाजी

"बघतोस काय, मुजरा कर."
तिच्याकडे बघताना
"राजे,तुम्ही परत या."
बार मधून निघताना
राजे परत येण्यासाठी
कुठे जिजाऊ अन् कुठे शहाजी
तुम्हीच सांगा आता परत
कसा येणार राजा शिवाजी

मातोश्री नाव जिजाऊंचे
अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान
या मराठी मातेचा
मराठी मातीला अभिमान
आज त्याच नावाच्या वृद्धाश्रमात
रडतात आजोबा अन् आजी
खरंच किती अर्थपूर्ण
समजलेत न शिवाजीरयतेतला एक
महेश नवलेउड़ता देश....माझा देश..!

चिमनी उड़
पोपट उड़
घार उड़
पंजाब उड़.....
पंजाब उड़......
उड़ता पंजाब...!
गम्मत म्हणजे अनुराग कश्यप उड़ता पंजाब साठी न्यायालयीन लढाई लढतोय आणि अखिल भारत वर्षाला आज फ़क्त पंजाबच्या उडण्याचे डोहाळे लागलेत...!

उड़ता पंजाब --- एक सिनेमा...!
सिनेमा कांट्रेवर्सी --- सिनेमा हिट....!
हे सूत्र जगजाहिर असताना आपण भारतीय सुजान नागरिक नेहमीच हा कांट्रेवर्सीचा फार्मूला हिट करतो.

आज मुद्दा आणि कार्यक्रम या दोन्हीच्या शोधात विरोधक आणि सत्ताधारी दोघेही टपुनच असतात......आणि 'राजकारण' म्हणून लोकशाहिचा सततच कणा ठरलेला सामान्य मानुस सो कॉल्ड आम आदमी ह्या  गोष्टींकडे सुन्दर डोळे झाक करताना दिसतो.

'राजकारण' जेवढं दलिन्दरपने करता येईल तेवढं ते प्रतिष्ठेचं ठरताना आपण बघत आलोय.

वर्षानुवर्ष भ्रष्ठ राजकारण करूनही एक ही आरोप न झालेल्या राजकारणी लोकांना कार्यकर्ता जमातीचा हीरो होताना आपण बघत आलोय.

नैतिकतेच्या गप्पा करणारा आपल्यातला एखादा सायको ठरताना आपण बघत आलोय..!

साठ-सत्तर वर्षांच्या लोकशाहित राजकारण शब्दाला बदनाम प्रतिष्ठा मिळत असताना आपण बघत आलोय..!

राजकारणी हा शब्द अविश्वासू, कावेबाज, कारस्थानि, नैतिकतेच्या साऱ्या सीमा ओलंडणारा असा समानार्थी बनताना आपण बघत आलोय..!

छोट्या मोठ्या गोष्टित जेव्हा राजकारण येऊ लागतं तेव्हा सामान्य मानुस तिथून दूर जाताना आपण बघत आलोय...!

सामान्य जणांचा आवाज ठरलेला - मीडिया सुद्धा आम्ही कावेबाज राजकारणी लोकांच्या दावनीला बांधलेला बघत आलोय.....!

थिंक टँक असते एक--- विरोधकांची अन् सत्ताधाऱ्यांची, जे ठरवतात माझ्या देशाची वाटचाल...त्यांना देशाची माहीत नाही पण स्वतःची वाट मजबूत करताना आम्ही बघत आलोय..!

आज प्रत्येक ठिकाणी भविष्याची वाटचाल चालू आहे मात्र तिथे संस्था, मंडळ, राज्य, देश केंद्रस्थानी नसून कुणी तरी औरच आहे..!

आणि या साऱ्यांचा मेळावा जमतो आणि एक पक्का राजकारणी गड उभा राहतो....!

आपापले शड्डू ठोकुन झाल्यावर हे सारे उडवतात म्हणजेच उडवून लावतात.....
आणि ज्याला उडवतात त्याला आपण म्हणतो
तो बघ...
तिकडे....
उड़ता देश...
माझा देश...
यांनी उड़वला.....या साऱ्या राजकारण्यांनी उड़वला....!

उड़ता देश...माझा देश..!


उड़ता उड़ता
महेश नवलेThursday, June 9, 2016

असच अस्तेय भौ...!

"आपल्याला नै आवडत भो जाती बीती..अन् आपण मानित बी नै ते...आई शप्पत..! खोट्टं कयला बोलाव भो.
तुला सांगतो नवले आपण लै काम केलय् गोरगरिबांसाठी.. हव..! 
अन् तेच्यात बी एस शी ,एस टी तुला सांगतो बघ एन टी - बिन टी सगळे ...साऱ्या केटेगरी बर्ं का..हव..!
दरवर्षी आपण वह्या वाटितो गरीबांना..! 
अन् तुला सांगतो बघ... कार्यक्रम एकदम जंगी बर्ं का...हव..एकदम जंगी...! हे मोक्कार लोकं..झेड पी बिड पि चट...हव..!
गेल्या वर्षी त भौ ...आमदार साहेब न भौ ....! तुला सांगतो नुसता धुर भौ नुसता धुर...!
बैनर तर इच्चारुच नको...हेई शप्पथ....! एकदम कड़क...हव...!
फुल्ल हवा...! नुसता धूर च काढतो भौ आपण...!बातमी अस्ति न आपली ... पेप्रात..!
पुण्यनगरी म्हणू नको, सक्काळ म्हणू नको इथून तिथून चट...हव...! 
ओळखी लै आपल्या...! नुसत्या फोनवर .....नुसत्या फोनवर कामं ...! 
वह्या वाटप सोबत टोरलामेंट अस्ति एक टेनिस बॉलवर...!"
तो सांगतच होता...
"लास्ट टाइम त्यांची जरा जास्तच जळली...अन् तुला तं महितच हे आपल्या गावात तेंचि टूरटूर जरा जास्तीच् होऊन राहिली ते..! मंग म्हनलं होऊन जाऊ दे..! आशे गपगार झाले म्हणून सांगू बिट्या...हव...!"
तो सांगतच होता....जरासा थांबून मला बोलला की....
"बर्ं ते जाउंदे, तू कस काय बॉ इकडं आज..! कही काम होतं का...!"
"नाही , विशेष नाही.... आलो होतो सहजच."--- मी.
"ओक्के."---तो
"अरे तो आपला, एस टी आई झाला नं,-सेल टैक्स इंस्पेक्टर, म्हंटलं चला जाता जाता अभिनंदन करुन जावं त्याचं."-मी.
"हम्..... आज काल काय कोणीबी काही बी होतय्..... मी तं आइकलय की कहितरि घोळ करुनच झालय ते.....यश टी आय."-तो
"नाही रे, हुशार हे तो पहिल्यापासून."- मी
"जाऊ दे रे, तुला बी लै पुळका हे त्यांचा.....!"-तो.
"त्याच्या अभिनंदनाचं बैनर नाही लावलं का रे तू..!"-मी.
"हे बघ भौ, तुला हे नं.... कही कळणार नहीं पाह्य...अरे ते लोकं लै बेरकि अस्तेत भो....बरोबर रंग दाखितेत येळेवर..! तुझ्या लक्षात नै यायचं भौ... जाऊ दे...!" - तो.
"अरे, पण तू तर बोलत होता नं तू काय मानीत नाही ते." - मी.
"तेच सांगतो न मी तुला, आपण अजिबात मानीत नहीं जाती बीती ते....जात पात काय रे..आपलेच खेळ सारे..! पण गावात जरा येगळं वातावरण हे भौ....! ते लोकं कोणाचेच नै भौ....!"-तो.


मी गांवातून बाहेर निघालो आणि क्षणभर माझी नजर एका बैनर वर स्थिरावली त्यावर लिहिलं होतं.....

"साऱ्यांचीच  जिरवून भाऊंची तंटा मुक्ति अध्यक्ष पदी निवड"

ठोकम् ठोक
महेश नवले

Wednesday, June 8, 2016

दरोडेखोर...!

वाल्या कोळी एक सुप्रसिद्ध दरोडेखोर...!
वाल्मीकि एक महान कवी...साहित्यिक वगैरे...
आणि
वाल्या कोळी आणि वाल्मीकि दोन्ही व्यक्ति एकच ..... 
हा एक डोळ्यात अंजन घालनारा योगायोग....!
वाल्मीकि होण्यासाठी वाल्या कोळ्याला त्याचा जन्म आणि त्याचे कर्म दोन्हीही आडवं आलं नाही हे एक दुर्लक्षित सत्य...!
आणि वाल्या कोळ्याचा वाल्मीकि होण्यासाठी कारणीभूत ठरलेला एक महत्वाचा क्षण असा की वाल्याला त्याच्या घरच्यांनी एका योग्य क्षणी नाकारलं ते....!

आज आपल्या आजुबाजूला कित्येक वाल्या कोळी टाकत आहेत दरोडे सरसकट... ....
कित्येक तर दरोडा हे आद्य कर्तव्य समजून केलेल्या भ्रष्ठ आचरणाचे नैतिक समर्थन देतात.....
कित्येक जन ग़ाफ़िल आहेत बायका मुलांना पैशातुन मिळनारी प्रतिष्ठा पाहून......
कित्येकांनी तर दरोडा हाच जीवनमार्ग करुन घेतलाय.....
कित्येक दरोडेखोर पांघरून आहेत भम्पक नैतिकतेचा बुरखा.....आणि लीलया करीत आहेत भ्रष्ठ आचरण......

आणि याच दरोडेखोरांची पिलावळ करत आहे निर्लज्ज थयथयाट भरदिवसा....भरचौकात.....नग्नताण्डव...!

या साऱ्या वाल्या कोळ्यांचा वाल्मीकि कधी होणार.....!
त्याच्या आयुष्यातला तो प्रसंग येईल का यांच्या आयुष्यात....!

आज मला तो क्षण आठवतो 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' मधला....
आणि त्याला स्मरून मी छाती ठोकुन सांगतो....
"माझा बाप ईमानदार आहे".

तुमचा बाप दरोडेखोर तर नाही ना.....!


ठोकम् ठोक विथ
महेश नवले
9763147471

प्रीय मित्रा......

प्रिय मित्रा....
तू नेहमीच सांगत आलाय इंजीनियरिंग हे तुझं क्षेत्र नाही, काहीतरी वेगळं कर....
म्हणून त्यात राहून तुला आवडेल असं काही करत आहे.
लिहित आहे....
ठोकम् ठोक हा शब्द विचित्र जरी वाटत असला तरी आपल्या ला तो बरा वाटतो... शाहन्याला शब्दाचा मार....
जेव्हा आपन सोबत होतो तेव्हा खुपच निरागस होतो.... समाजाच्या काळ्या गडद रंग छठा तेव्हा सुद्धा तितक्याच् गडद होत्या मात्र आपल्या मैत्रीचा रंग औरच....
तो रंग आज ही तसाच अबाधित आहे मात्र तरीही इतर रंग कळत नकळत कधी मिक्स झाले ते खरोखर कळले नाही....
ठोकम् ठोक त्यासाठीच.....
नियमित वाचत जा...
म्हणजे मी लिहित जाईल...
तेव्हाचा निरागस पणा मी सुद्धा हरवून बसलोय....
चल शोधुयात.....
तू सुद्धा बोलत जा....एखाद्या ओळीत....
चुकलं काही तर...सांगत जा.....
म्हणजे मी लिहित जाईल.....
तुझाच मित्र
महेश

Tuesday, June 7, 2016

सैराट चा चश्मा...!!!

सैराट विषयी खूप खूप ऐकल्यानंतर,एके दिवशी मी आणि बायको आवरून सावरून सैराट बघायला निघालो.
बुक माय शो वरून आदल्या रात्रीच् तिकिटे काढून ठेवलेली असल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर उगिचच गड जिंकलेल्या तरीही मध्यम वर्गीय अशाच विजयी छटा उमटलेल्या मी एक्टिवाच्या मिरर मधे स्पष्ठ बघितल्या.
आपणच खूप श्रीमंत आहोत अशा अविर्भावात फिरण्याच्या वातावरणात आम्ही दोघे काही मिनिटांतच पोहचलो.
प्रोज़ोन मॉल च्या एंट्रन्सलाच मी पायऱ्यावर धड़पडलो आजुबाजूच्या इतर गर्भश्रीमंतांनी माझ्याकडे जमेल तितका तिरकस कटाक्ष टाकला. मी जास्तच बुजलो अर्थातच सौ. ने सावरले.
वर पोहचलो तेव्वा गर्भश्रीमंत लोकांचे जत्थेच्या जत्थे मॉल मधे मोठ्या आत्मविश्वासाने फिरत होते. अर्थातच मी पुन्हा सौ मुळे सावरलो.
आइनॉक्स समोर ही गर्दी जरा जास्तच होती.
बुक माय शो चा मैसैज मी टिकिट काउंटर वर दाखवून तिकिटे मिळवली मात्र या वेळी विजयाचा उन्माद काय चेहऱ्यावर झळकला नाही.
का कुणास ठाऊक पण या वातावरणात डुअर कीपर मला खूप जवळचा वाटला. टिकट तपासून आत आलो आणि जरा गोंधळलो... आणि तोच गोंधळ ओळखून एक जन जवळ आला आणि म्हटला की, "सर ,तुम्ही कुठला मूवी बघायला आला आहात?"
तो सर म्हटला याचा आनंद लपवतच "सैराट"-मी
"तर,तुम्हाला चश्मा घ्यावा लागेल."-तो
सैराट 3 डी आहे असा समज करुन चश्मा घेण्यासाठी आम्ही रांगेत उभे राहीलो.
रांग हळू हळू पुढे सरकत होती...
आणि लक्षात आले की सैराट हा सिनेमा 3 डी नसून मल्टीडायमेनशनल आहे ते.
आणि म्हणूनच लोकं वेगवेगळी चश्मे घालून आत जात होती.
चश्मा 1- भम्पक संस्कृति रक्षकाचा
चश्मा 2- भम्पक पुरोगामीत्वाचा
चस्मा 3- अभ्यासु समीक्षे चा
चश्मा 4- जातीयतेचा
चश्मा 5- जाती अभिमानाचा
चश्मा 6- श्रेष्ठ तम रसिकतेचा
आणि बरेच....
आता मी जाम गोंधळलो....
.
.
.
गोंधळ घेवुनच आत गेलो ....
सैराट बघितला...
खूप खूप जगलो....
म्हणजेच हसलो आणि रडलोही.....
जगन्या साठी दोन्ही पाहिजे...
सैराट पडद्यावर संपला...जाताना काही जणांचे चश्मे बदलेले दिसले, काहींचे फुटलेले दिसले, काहींचे हरवलेले दिसले.... काहींचे मात्र तेच चश्मे डोळ्यांवर दिसले....!

एका माणसाने मात्र सैराट सिनेमा बिना चष्म्याचाच बघितला होता. 
मी आवर्जून त्याला  गाठलं.
बायको सुद्धा बोलली की,
"अहो, हाच तो मानुस...!"
त्यावर खूप छान हसून तो बोलला....
"हो, मीच तो मानुस...!"

त्याच्या पेक्षा छान हसन्याचा प्रयत्न करत मी बोललो.....
"हो, हाच तो मानुस....!"


सैराट आपल्याला मानुस होऊन विचार करण्याची आणि मानुस होण्याची संधि देतो.
-महेश नवले
9763147471

। बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवराय ।

माझा राजा आज राजा झाला।
रयतेचा विश्वास जागा झाला ।
तेली कोळी कुनबी सारे
बंधू माझे एक झाले
स्वराज्य माझे या राजाने
स्वप्न जे ते सत्य झाले।

जाती अन्ताचा प्रयत्न करणारा आद्य समाज सुधारक --माझा राजा

शुर लढवय्या जात सार्यांचीच हे दाखवनारा ----- माझा राजा

हिन्दू मुस्लिम दरी संपविनारा---- राजा माझा

स्री जातीचा विश्वास ---- राजा माझा

ज्याच्या साठी तानाजी हसत हसत लढत गेला असा ----- राजा माझा

ज्याच्या साठी जीवा महाला जीवा वरती उदार झाला असा----- राजा माझा


सावल्या तांडेल प्रामाणिक तो
जो म्हणाला राजाला ही
खबरदार जर टाच मारुनी येई पुढे रे गड्या
चिंधड्या उडविल राइ राइ एवढ्या
----अशी प्रशासनातील शिस्त जपनारे बहुजन वीर ओळखनारा
------राजा माझा

काय काय सांगू .....

आज ही समजू न शकलेला....
कुजलेल्या मेंदूंच्या आवाक्यात न आलेला.....
सडलेल्या बुद्धिला सतत अड्सर ठरलेला.....
कपटी कारस्थानि बुद्धि ला सतत खुपनारा.....


आणि 90%नालायक पिढीला चुकीचा समजलेला

तरी ही
ज्यांना समजला त्यांच्यातून कोटि कोटि शिवाजी जन्मांस आननारा
------राजा माझा
------राजा माझा
-------राजा माझा

शिव राज्याभिषेक दिनाच्या प्रेम आणि शुभेच्छानसह्
----महेश नवले
----पैठण.
🙏🙏🙏🙏