संसार तुझा माझा....!

तो:( खूपच समजुतिच्या स्वरात)
जन्मों जन्मिची गं साथ
दैव दोघाचं लागतं
इथं तुझं माझं नाही
दैव गुपित सांगतं

ती:( त्याला समजून घेत)
गोड संसार रे इथे
सदा लागायचा नाही
कडु गोड हिशोब तू
कधी मागायचा नाही

तो:( आणखी समजून सांगत)
सखे संसार संसार
थोरा मोठ्यांचा गं धाक
सखे संसार संसार
एक गाड़ी दोन चाक

ती:( पुन्हा त्याला समजून घेत)
वेगवेगळे रे चाक
परि आस एक आहे
वेगवेगळे रे दोघ्ं
परि श्वास एक आहे

तो:(तिच्या समजूतदार पणावर खुश होत)
सखे कशाला यमक
सखे कशाला तमक
जुळे तुझा माझा सुर
हेच सुखाचं गमक



आता दोघ्ंही:( समजून उमजुन स्माइल देत)
जुळे तुझा माझा सुर
हेच सुखाचं गमक




चला सुर जुळवूयात
By
Vimalhari

Comments

Unknown said…
मस्त मस्त

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!