Tuesday, June 7, 2016

सैराट चा चश्मा...!!!

सैराट विषयी खूप खूप ऐकल्यानंतर,एके दिवशी मी आणि बायको आवरून सावरून सैराट बघायला निघालो.
बुक माय शो वरून आदल्या रात्रीच् तिकिटे काढून ठेवलेली असल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर उगिचच गड जिंकलेल्या तरीही मध्यम वर्गीय अशाच विजयी छटा उमटलेल्या मी एक्टिवाच्या मिरर मधे स्पष्ठ बघितल्या.
आपणच खूप श्रीमंत आहोत अशा अविर्भावात फिरण्याच्या वातावरणात आम्ही दोघे काही मिनिटांतच पोहचलो.
प्रोज़ोन मॉल च्या एंट्रन्सलाच मी पायऱ्यावर धड़पडलो आजुबाजूच्या इतर गर्भश्रीमंतांनी माझ्याकडे जमेल तितका तिरकस कटाक्ष टाकला. मी जास्तच बुजलो अर्थातच सौ. ने सावरले.
वर पोहचलो तेव्वा गर्भश्रीमंत लोकांचे जत्थेच्या जत्थे मॉल मधे मोठ्या आत्मविश्वासाने फिरत होते. अर्थातच मी पुन्हा सौ मुळे सावरलो.
आइनॉक्स समोर ही गर्दी जरा जास्तच होती.
बुक माय शो चा मैसैज मी टिकिट काउंटर वर दाखवून तिकिटे मिळवली मात्र या वेळी विजयाचा उन्माद काय चेहऱ्यावर झळकला नाही.
का कुणास ठाऊक पण या वातावरणात डुअर कीपर मला खूप जवळचा वाटला. टिकट तपासून आत आलो आणि जरा गोंधळलो... आणि तोच गोंधळ ओळखून एक जन जवळ आला आणि म्हटला की, "सर ,तुम्ही कुठला मूवी बघायला आला आहात?"
तो सर म्हटला याचा आनंद लपवतच "सैराट"-मी
"तर,तुम्हाला चश्मा घ्यावा लागेल."-तो
सैराट 3 डी आहे असा समज करुन चश्मा घेण्यासाठी आम्ही रांगेत उभे राहीलो.
रांग हळू हळू पुढे सरकत होती...
आणि लक्षात आले की सैराट हा सिनेमा 3 डी नसून मल्टीडायमेनशनल आहे ते.
आणि म्हणूनच लोकं वेगवेगळी चश्मे घालून आत जात होती.
चश्मा 1- भम्पक संस्कृति रक्षकाचा
चश्मा 2- भम्पक पुरोगामीत्वाचा
चस्मा 3- अभ्यासु समीक्षे चा
चश्मा 4- जातीयतेचा
चश्मा 5- जाती अभिमानाचा
चश्मा 6- श्रेष्ठ तम रसिकतेचा
आणि बरेच....
आता मी जाम गोंधळलो....
.
.
.
गोंधळ घेवुनच आत गेलो ....
सैराट बघितला...
खूप खूप जगलो....
म्हणजेच हसलो आणि रडलोही.....
जगन्या साठी दोन्ही पाहिजे...
सैराट पडद्यावर संपला...जाताना काही जणांचे चश्मे बदलेले दिसले, काहींचे फुटलेले दिसले, काहींचे हरवलेले दिसले.... काहींचे मात्र तेच चश्मे डोळ्यांवर दिसले....!

एका माणसाने मात्र सैराट सिनेमा बिना चष्म्याचाच बघितला होता. 
मी आवर्जून त्याला  गाठलं.
बायको सुद्धा बोलली की,
"अहो, हाच तो मानुस...!"
त्यावर खूप छान हसून तो बोलला....
"हो, मीच तो मानुस...!"

त्याच्या पेक्षा छान हसन्याचा प्रयत्न करत मी बोललो.....
"हो, हाच तो मानुस....!"


सैराट आपल्याला मानुस होऊन विचार करण्याची आणि मानुस होण्याची संधि देतो.
-महेश नवले
9763147471

2 comments:

Rohit Mohod said...

Khup Chan parikshan kelay sir tumi..tumch sahityala kaitri vegla touch ahe..hatsoff sir

Unknown said...

Ata khara sairat zalay....