Friday, June 10, 2016

उड़ता देश....माझा देश..!

चिमनी उड़
पोपट उड़
घार उड़
पंजाब उड़.....
पंजाब उड़......
उड़ता पंजाब...!
गम्मत म्हणजे अनुराग कश्यप उड़ता पंजाब साठी न्यायालयीन लढाई लढतोय आणि अखिल भारत वर्षाला आज फ़क्त पंजाबच्या उडण्याचे डोहाळे लागलेत...!

उड़ता पंजाब --- एक सिनेमा...!
सिनेमा कांट्रेवर्सी --- सिनेमा हिट....!
हे सूत्र जगजाहिर असताना आपण भारतीय सुजान नागरिक नेहमीच हा कांट्रेवर्सीचा फार्मूला हिट करतो.

आज मुद्दा आणि कार्यक्रम या दोन्हीच्या शोधात विरोधक आणि सत्ताधारी दोघेही टपुनच असतात......आणि 'राजकारण' म्हणून लोकशाहिचा सततच कणा ठरलेला सामान्य मानुस सो कॉल्ड आम आदमी ह्या  गोष्टींकडे सुन्दर डोळे झाक करताना दिसतो.

'राजकारण' जेवढं दलिन्दरपने करता येईल तेवढं ते प्रतिष्ठेचं ठरताना आपण बघत आलोय.

वर्षानुवर्ष भ्रष्ठ राजकारण करूनही एक ही आरोप न झालेल्या राजकारणी लोकांना कार्यकर्ता जमातीचा हीरो होताना आपण बघत आलोय.

नैतिकतेच्या गप्पा करणारा आपल्यातला एखादा सायको ठरताना आपण बघत आलोय..!

साठ-सत्तर वर्षांच्या लोकशाहित राजकारण शब्दाला बदनाम प्रतिष्ठा मिळत असताना आपण बघत आलोय..!

राजकारणी हा शब्द अविश्वासू, कावेबाज, कारस्थानि, नैतिकतेच्या साऱ्या सीमा ओलंडणारा असा समानार्थी बनताना आपण बघत आलोय..!

छोट्या मोठ्या गोष्टित जेव्हा राजकारण येऊ लागतं तेव्हा सामान्य मानुस तिथून दूर जाताना आपण बघत आलोय...!

सामान्य जणांचा आवाज ठरलेला - मीडिया सुद्धा आम्ही कावेबाज राजकारणी लोकांच्या दावनीला बांधलेला बघत आलोय.....!

थिंक टँक असते एक--- विरोधकांची अन् सत्ताधाऱ्यांची, जे ठरवतात माझ्या देशाची वाटचाल...त्यांना देशाची माहीत नाही पण स्वतःची वाट मजबूत करताना आम्ही बघत आलोय..!

आज प्रत्येक ठिकाणी भविष्याची वाटचाल चालू आहे मात्र तिथे संस्था, मंडळ, राज्य, देश केंद्रस्थानी नसून कुणी तरी औरच आहे..!

आणि या साऱ्यांचा मेळावा जमतो आणि एक पक्का राजकारणी गड उभा राहतो....!

आपापले शड्डू ठोकुन झाल्यावर हे सारे उडवतात म्हणजेच उडवून लावतात.....
आणि ज्याला उडवतात त्याला आपण म्हणतो
तो बघ...
तिकडे....
उड़ता देश...
माझा देश...
यांनी उड़वला.....या साऱ्या राजकारण्यांनी उड़वला....!

उड़ता देश...माझा देश..!


उड़ता उड़ता
महेश नवले8 comments:

Unknown said...

Excellent Mahesh...

Unknown said...

Excellent Mahesh...

leonardo da vinci said...

महेश छान !!
सेंसोरही रंगीत चष्मे परीधान करत असतं.. सत्तांतरासोबत रंग बदलणारे...
ज्यांचा दृष्टीकोणच संकुचित असेल त्यांच्याकडून परीघाबाहेर बघाण्याचा अट्टहास म्हणजे केवळ अरण्यरूदनच !

Rohit Mohod said...

Hya muddyala kuthlya point of view ne pahav ha prashna amchyasarkhya alpabuddhidharak lokana padlay

Gopal Dhole said...

खुपच छान. सध्य

Hindustan Republic Association said...

Very nice

Unknown said...

Mast

Anonymous said...

"राम तेरी गंगा मैली" मधील scene म्हणजे भारतीय पूर्वार्ध दर्शन आणि आम्ही काहही दाखवलं तर ते nudity अशी टिप्पणी करणारे लोक सिनेमा क्षेत्रात तसेच sensor मध्ये असताना controversy होणारच..
काय कशाशी खातात हे तरी कळत का या लोकांना???