हसनं हीच साईकल...!

एक मानुस दररोज एका चेक पोस्ट समोरून साइकिल वरुण गोनी घेऊन जात असे आणि चेक पोस्ट वरील इंस्पेक्टर दररोज त्याची गोनी न चुकता चेक करत असे.... आणि त्यात दर रोजच वाळू सापडत असे.

असा नित्यक्रम जवळ जवळ वर्षभर चालला असेल.
नंतर त्या इंस्पेक्टरची बदली झाली आणि त्या मानसाचे ही सायकल वरुन वाळूची गोनी घेऊन जाने बंद झाले.




काही दिवसांनी त्या शहरात चोरी केलेल्या जवळ जवळ 250 ते 300 सायकली सापडतात.


चला आता खरी गम्मत....करुया.....

आपलहि असं च काहीसं होतं...
सुख हे त्या सायकली प्रमाणे ....
आणि इंस्पेक्टर म्हणजे आपण स्वतः

गोनी आणि वाळू म्हणजे बिन महत्वाच्या गोष्टि....
आयुष्य निघुन जातं आणि आपण मात्र वाळू आणि गोनी यातच अडकून बसतो.
सुख सायकल सारखं लख्ख डोळ्यासमोर...... आपण मात्र लक्षही देत नाही....
आणि शेवटी मात्र हाच विचार असतो की साइकिल लख्ख समोर होती आणि आपण......

हँसा
साइकिल कड़े लक्ष्य ठेवा...
गोनी मधे अड़कु नका...



चला हसूया हसूया
चला हसूया हसूया

अनमोल आहे असे
चला आज हो अर्पूया


देव राजा त्या मनीचा
ज्यात हसु वसतसे
देव त्याच्या साठी उभा
जो सदा हसतसे

आज मोकळे मोकळे
चला करुया आकाश
कसा हसून हो बघू
देव येतो सावकाश


हास्य हलके हलके
हास्य पुष्प मकरंद
देव अन्तरिचा दाटे
मनो मनी हो सुगंध

हास्य दरवळ अशी
कशी निखळ निखळ
देव नाचे अंतरात
जसा झरा अवखळ

उगी विचार फिचार
उगी गोंधळ मांडला
देव नाचताना बघ
घट चिंतेचा सांडला





आज पासून आपन साऱ्यांनी फ़क्त हसायचं.
किती छान...
मी अडकलोय,.,बाहेर कसा येईल...येशिल रे बाबा ..... पण आधी हसून घे पुरेपूर....

माला नेहमी असं वाटतं आणि माझं मन खातं.....
बघ आधी हसून घे.
मनाला खाऊ नको जे वाटतं ते चांगलं करुन टाक....आणि हो परत मनसोक्त हसावे...

हँसने हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी हसनारच....
विनाकारण हसनार...

मी आत्ता पासून सतत गाणी गुनगुननार.....
माझ्या चेहऱ्यावर सतत स्माइल असणार....
मी डिंग्चक ऑफ बिट नाचनार सुद्धा....
मी लहान लेकरांना बघत जाईल....आणि लहान होईल.....



मी हसनारच।
मी हसनारच।
आणि मी हसनारच|


महेश नवले

Comments

सर पन आपली सायकल कोनती ते कस समजनार
अन् ते नाही समजल तर मग वाळू आन् गोनितच आडकायच का......???
Firki said…
आपली साइकिल कोणती हाच प्रश्न असेल....उगी विचार फिचार उगी गोंधळ मांडला देव नाचताना बघ घट चिंतेचा सांडला....
Unknown said…
गोनी आणि वाळू म्हणजे बिन महत्वाच्या गोष्टि....

पण त्या कोणत्या??? आणि ते आपण कसे ठरवनार???
Unknown said…
म्हणजे इथून पुढे फक्त सायकलींवरच लक्ष ठेवायला पाहिजे तर
Admin said…
मी हसनारच।
मी हसनारच।
आणि मी हसनारच|
Unknown said…
Me nahi Hasnaar 😉 Kadhi Aarshyat Pahun Mansokt manmokle mnane swatahavar Hasun dakhva

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!