माझ्या शाळेची पायवाट...!


माझ्या शाळेची पायवाट मी रोजच तुड़वीते अगदी नाचत नाचत...
कारण
ती पायवाट सुरु झाली की माझ्या कुहू ला मिळतो प्रतिसाद कुठल्यातरी झाडातुन सहज....
फुलपाखरु किती नाजुक आणि सुन्दर ...सहज येवून बसतं माझ्या तळ हातावर...
दवबिंदुच्या मोत्याच्या कणांना हात लावत नाही मी कधी कारण मला माहीत आहे की त्याचा झगमगाट सारा खोटाच्...!
निसर्गाचं हे चित्र दाखवत दाखवत माझ्या शाळेची पायवाट मला रोज शाळेत घेऊन जाते....

शाळेत 'कोयल' आहे माझ्या....नाजुक अन् सुन्दर....तिच्याकडे असते खूप महागड्या कम्पास पेट्या,पेन,पेन्सिल आणि सारं....

ती माझ्याशी बोलतही नाही...
सर, तिला माझ्या शेजारी बसू ही देत नाही
आणि हो ती मला तिच्या कम्पास पेटीला हात पण लावू देत नाही....

मला परत आठवते तेव्हा सकाळची माझ्या शाळेची पायवाट..कुहू जी बोलते, नाजुक फुलपाखरु जे येऊन बसतं हातावर, आणि हातात घेतल्यावर संपणारे दवबिंदु...!

मला जसं ते चित्र आवडतं निसर्गाचं....
तसं शाळेच्या भिंतीवरचे काही चित्र खूप आवडतात...
त्या चित्रांच्या ख़ाली लिहिलेलं असतं
पहिल्या चित्राखाली... छ.शाहू महाराज
दुसऱ्या चित्राखाली....डॉ.बाबासाहेब आंबेडकर
तिसऱ्या चित्राखाली...म.फुले

Comments

Unknown said…
Ata vattaay thoda krantikari types
Unknown said…
एकदम फ्याँड्री च की.....
Unknown said…
एकदम फ्याँड्री च की.....

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!