शिवाजी राजं समजून घेताना....!

शिवाजी समजून घेण्यासाठी
म्हणे शिवाजी व्हावं लागतं
इथं आम्ही मुर्दाड सारे
तुम्हाला सांगायला काय जातं..!
ईमान आम्ही विकलाय इथं
विकल्यात आम्ही लाजा
तुम्ही आम्हाला काय सांगता
समजून शिवाजी राजा

आमच्या मनांत मुसलमानांना
कापनारा तो शिवाजी
आमच्या मनांत हिरवं निशान
 जाळनारा तो शिवाजी
खरं सांगायचं तं शिवाजीसाठी
नमाज़ पढायचा काजी
असा सारा सावळा गोंधळ
कसा समजनार राजा शिवाजी

स्वराज्यासाठी प्राणपणानं
मावळा आमचा लढला
आज मात्र ज्यानं त्यानं
जातीनं निवडून काढला
मी अमक्या जातीचा म्हणत
लढला असेल का तानाजी
हो असेल उत्तर तर
कसा समजनार राजा शिवाजी

ज्यानं त्यानं सोयीसोयीनं
इतिहास असा रचला
याचा वाढला स्वाभिमान
त्याचा मात्र खचला
या इतिहासाला महाराज सुद्धा
झाले असतेत का राजी
हो असेल उत्तर तर
कसा समजनार राजा शिवाजी

"बघतोस काय, मुजरा कर."
तिच्याकडे बघताना
"राजे,तुम्ही परत या."
बार मधून निघताना
राजे परत येण्यासाठी
कुठे जिजाऊ अन् कुठे शहाजी
तुम्हीच सांगा आता परत
कसा येणार राजा शिवाजी

मातोश्री नाव जिजाऊंचे
अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान
या मराठी मातेचा
मराठी मातीला अभिमान
आज त्याच नावाच्या वृद्धाश्रमात
रडतात आजोबा अन् आजी
खरंच किती अर्थपूर्ण
समजलेत न शिवाजी







रयतेतला एक
महेश नवले



Comments

Unknown said…
Jay bhawani jay shiwaji
Unknown said…
One of d best..
Unknown said…
One of d best..
Khupach chhan kavita keli ahe sir

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!